महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी सूरज मांढरे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सूरज मांढरे यांनी १२ मार्च २०१९ रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच त्यांनी या कार्यकाळात सेवा आणि कायदा आणला. याअंतर्गत राज्य सरकारच्या २० सेवा येत असून त्यात एकूण १०१ सेवा आणल्या. तसंच जिल्ह्यातील ५८ मुलांना शासकीय मदत दूत योजनेतून मदतीचा हात पुढे करत त्यांचं पालकत्व स्वीकारलं. त्यांच्या या कामासाठी नुकताच त्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला आहे.
राज्यातील नऊ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचाही समावेश आहे. सूरज मांढरे यांची राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी करण्यात आली आहे.
तर नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी गंगाधरन डी यांची वर्णी लागली आहे. गंगाधरन डी हे याआधी मंत्रालयात मुख्यसचिवांचे उपसचिव म्हणून काम करत होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षे कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये ड़ॉक्टर संजय चहांदे, ए.एम लिमये, एसए तागडे, आभा शुक्ला, डॉक्टर अमित सैनी, आरएस जगताप, विवेक भीमानवार, राहुल द्विवेदी आणि गंगाधरन देवराजन यांचा समावेश आहे.