महाराष्ट्र
खेळामुळे जीवन यशस्वी होते.- डॉ.विनायक हाडके
By Admin
खेळामुळे जीवन यशस्वी होते.- डॉ.विनायक हाडके
पाथर्डी- प्रतिनिधी
स्व .आ . राजीवजी राजळे यांच्या ५3 व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनदादा पाटील राजळे महाविद्यालय आदिनाथनगर येथे करण्यात आले होते . स्व.आ. राजीवजी राजळे यांच्या स्मृतीस उजाळा देत डॉ . हाडके यांनी राजीवजी राजळे यांची दूरदृष्टी, तसेच समाजसेवेची वृत्ती विषद केली . खेळामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते व जीवन यशस्वी होते असे त्यांनी सांगितले . या स्पर्धेचे तीन गटात आयोजन करण्यात आले होते . इयत्ता ५ वी ते ७ वी मुले या वयोगटात एक किलोमीटर अंतरासाठी आयोजित स्पर्धेत , आदित्य राजू बर्डे ,शरदचंद्र पवार विद्यालय , तिसगाव याने प्रथम क्रमांक पटकावला . द्वितीय क्रमांक, पायमोडे समर्थ बाबासाहेब ,
न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर व तृतीय क्रमांक हर्षद अरुण भोसले , भिंगार हायस्कूल भिंगार यांनी मिळवला . इयत्ता ५ वी ते ७ वी मुली प्रथम क्रमांक कु. वैभवी विजय खेडकर , भिंगार हायस्कूल भिंगार . द्वितीय क्रमांक शिर्के प्रणिता प्रदीप , भिंगार हायस्कूल भिंगार . तृतीय क्रमांक शौर्या हर्षद बेरड , भिंगार हायस्कूल भिंगार . ८ वी ते १० वी मुले प्रथम काकडे सुमित प्रल्हाद ,श्री छत्रपती विद्यालय कोरडगाव , द्वितीय सोनवणे विजय रामनाथ, श्रमशक्ती माध्यमिक विद्यालय संगमनेर, तृतीय भोसले विराज अरुण भिंगार हायस्कूल भिंगार . ८ वी ते १०वी मुली प्रथम खेडकर वैष्णवी विजय भिंगार हायस्कूल भिंगार . द्वितीय नवगिरे कार्तिकी शशिकांत न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर . तृतीय थिटे श्रद्धा कानिफनाथ न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर . खुला गट मुले प्रथम मरकड किशोर विठ्ठल, शिवछत्रपती करिअर अकॅडमी. द्वितीय प्रवीण सोमनाथ राऊत संगमनेर कॉलेज संगमनेर . तृतीय बेरड स्वराज नवनाथ भिंगार हायस्कूल भिंगार. खुला गट मुली प्रथम कु .बावस्कर विशाखा अमोल, राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर . द्वितीय वलवे पुनम अरुण, संगमनेर महाविद्यालय संगमनेर. तृतीय बेग करीना अहमद भिंगार हायस्कूल भिंगार . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक , सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक प्रमुख पाहुण्यांचे हस्ते वितरित करण्यात आले. स्पर्धेसाठी एकूण २४६ विद्यार्थी जिल्हाभरातून सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाघाटन युवा नेते मा . श्री राहुलदादा राजळे जि. प . सदस्य अहमदनगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री रामकिसन काकडे हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . विनायकराव हाडके, ज्येष्ठ संचालक श्री उद्धवराव वाघ, श्री सुभाषराव ताठे, श्री यशवंतराव गवळी, श्री साहेबराव सातपुते , श्रीकांत मिसाळ , श्री कुशिनाथ बर्डे , श्री बाळासाहेब गोल्हार , श्री काकासाहेब शिंदे , श्री वसंतराव भगत , श्री शेषराव ढाकणे , श्री रामदास मस्के , मा . जे . आर . पवार , आर .जे . महाजन , बी.एम. गोरे , विक्रमराव राजळे , प्राचार्य डॉ. राजधर टेमकर , प्राचार्य डॉ.युवराज सूर्यवंशी मुख्याध्यापक बी.आर.ताठे,भाऊसाहेब आठरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . राजेंद्र इंगळे यांनी केले तर आभार शारीरिक शिक्षण संचालक प्रा. रोहित आदलिंग यांनी मानले .
Tags :
17180
10