दादापाटील राजळे महाविद्यालयात वृद्धेश्वर नियतकालिकाचे प्रकाशन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय , आदिनाथनगर येथे वृद्धेश्वर नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले . शैक्षणिक वर्ष 2021 - 22 मधील वृद्धेश्वर नियतकालिकाचे प्रकाशन मा. श्री.डॉ.विनायकराव हाडके , जिल्हा परिषद सदस्य मा. श्री राहुलदादा राजळे , श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मा. श्री उद्धवराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. श्री रामकिसन पाटील काकडे हे होते . शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात घेण्यात आलेले विविध कार्यक्रम तसेच विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळलेले यश , विद्यार्थ्याचे स्वलिखित साहित्य इत्यादींचा या अंकात समावेश आहे . माजी आमदार राजीवजी राजळे यांच्या ५३ व्या जयंतीचे औचित्य साधून या अंकाचे प्रकाशन करण्यात आले . या कार्यक्रमात माननीय श्री जे . आर . पवार साहेब व मा. श्री रामदास म्हस्के सर संचालक साहेबराव सातपुते हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रा. रोहित आदलींग यांनी आभार मानले . या नियतकालिकाचे संपादक प्रा. डॉ. एस . बी . देशमुख , सहसंपादक प्रा .डॉ . आर.पी.घुले ,डॉ. जे. टी.कानडे प्रा . डॉ . एम . एस . तांबोळी , डॉ.अतुल चौरपगार, प्रा.पाटोळे ए. के. , प्रा. ए . एच . देसाई , प्रा. डी . डी . चौधर प्रा. डी. बी. गायकवाड, प्रा. सी.एन . पानसरे उपस्थित होते . वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.