सहकाराचा वटवृक्ष निर्माण केला, 'या' साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृषी औद्योगिक विकासाचा पाया घालून सहकाराची गंगा खेडोपाडी पसरवली. या सहकार चळवळीची नगर जिल्ह्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, माजी मंत्री भाऊसाहेब थोरात, शिवाजीराव नागवडे, यशवंतराव गडाख, शंकरराव काळे, मारुतराव घुले यांनी मुहूर्तमेढ रोवली व सहकाराचा वटवृक्ष निर्माण केला. त्यांचीच नवी पिढी त्यांचा आदर्श घेत उत्तमरीत्या सहकारी संस्था सांभाळत आहेत,’ असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ४७ वा गळीत हंगाम शुभारंभ झाला त्यावेळी डॉ. तांबे बोलत होते. यावेळी आमदार लहुजी कानडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, चेअरमन राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, केशव मगर, अण्णासाहेब शेलार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव घनवट, नगराध्यक्षा शुभांगी पोटे आदी उपस्थित होते.