कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रतिटन प्रोत्साहनपर अनुदान देणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर कार्यरत असलेल्या सहकार महर्षी संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आर्थिक मंदी व कोरोनाच्या संकटातही शेतकरी, सभासद व कामगारांना मदतीची परंपरा कायम राखत यावर्षी दिवाळी निमित्त कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रतिटन प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महसूल बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 55 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रतापराव ओहोळ होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, अॅड.माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, लक्ष्मणराव कुटे, गणपतराव सांगळे, शंकर खेमनर, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार आदी उपस्थित होते.