महाराष्ट्र
4166
10
पैठण- पंढरपूर पालखी मार्गाच्या अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादनाच्या
By Admin
पैठण- पंढरपूर पालखी मार्गाच्या अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादनाच्या सर्व तक्रारीचे निवारण
मार्च महिन्यात मिळणार भूसंपादनाचा मावेजा - खा.डाॅ.सुजय विखे पाटील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या पैठण-पंढरपूर या पालखी मार्गासाठी पाथर्डी ,अहमदनगर या दोन तालुक्यातील भूसंपादनाचे प्रकरणे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निकाली काढून संबंधित शेतकरयास मार्च मध्ये त्याचा मावेजा दिला जाणार असल्याचे दक्षिण नगरचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. या प्रलंबित राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या मावेजा संबंधित दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता एन.बी शेलार, महामार्गचे विभागीय अधिकारी प्रकाश थेडगे,औरंगाबाद परिमंडलचे कार्यकारी अभियंता डि. एस. गलांडे, अहमदनगरचे प्रांत आधिकारी श्रीनिवास अर्जुन, पाथर्डीचे प्रांत आधिकारी बालाजी क्षीरसागर,औरंगाबाद विभागाचे उपअभियंता सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार विखे पाटील यांनी उपस्थिती आधिकारयांकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752ई अर्थात पैठण-पंढरपूर पालखी मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग 361 ए या रखडलेल्या महामार्गच्या कामाचा आढावा घेतला, यावेळेस संबंधित आधिकारयांनी भूसंपादनाच्या मावेजा अद्याप पर्यंत प्रलंबित आहे , त्यामुळे शेतकरया मध्ये नाराजीचा सूर आहे. यावर खासदार विखे यांनी या प्रकरणी पुढील आठवडय़ात सर्व विभागांची तातडीची बैठक आयोजित करून त्याबाबत तात्काळ कारवाई झाली पाहिजे असे आदेशित केले. फेब्रुवारीत संबंधित शेतकरया बरोबर भूसंपादनाच्या मावेजा विषयी चर्चा करून मार्च मध्ये त्या शेतकरयास मावेजा गेला पाहिजेत अशा सुचना दिल्या.
दरम्यान पाथर्डी-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752(ई) आणि खरवंडी-नवगण राजूरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361(ए)या मार्गाचे काँक्रिट करण करण्यास अनेक अडचणी येत असून या ऐवजी त्या ठिकाणी डांबरीकरण केले तर पैसे पण कमी लागतील आणि उर्वरित 25 कोटी निधी हा भूसंपादनासाठी वापरावा अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे घेतलेल्या बैठकीमुळे वारकरी यांच्या बरोबरच अहमदनगर जिल्हावासियांच्या अडचणी दूर होणार आहेत, एवढेच नाहीतर शेतकरयांचा रखडलेला मावेजा देखील मार्च मध्ये मिळणार आहे.
Tags :

