महाराष्ट्र
2841
10
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा.अन्यथा
By Admin
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा.अन्यथा १३ फेब्रुवारीला पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा - आमोद नलगे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
या मोर्चाचं गांभिर्य जर सरकारने घेतले नाही तर पूढील मोर्चेबांधणी करून सरकारला सळो की पळो करून टाकू कारण जे शिक्षक आणि शिक्षकेत्तर बांधव देशाचा आणि राज्याचा पाया रचण्याचं काम करतात त्यांनाच सरकार वंचित ठेवत आहे. त्यामूळे शिक्षकेत्तरांमध्ये सरकार विरोधी द्वेश निर्माण झाला आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा.अन्यथा विविध न्याय हक्काच्या मागण्या संदर्भात १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून या मोर्चामध्ये शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.या मोर्चाची कर्मचाऱ्यांनी जोरदार चर्चा सुरू केली आहे.या मोर्चात जास्तीत जास्त शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहीती शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव आमोद नलगे अध्यक्ष भिमाशंकर तोडमल यांनी दिली आहे.यावेळी गोवर्धन पांडुळे, भानुदास दळवी,भागाजी नवले,भाऊसाहेब थोटे,पद्माकर गोसावी,निवृत्ती लोंखडे,जयराम धांडे,किशोर मुथा,विजय हराळे, श्री. बोरुडे,नाना डोंगरे,शिरीष राऊत ,सविता शिंदे यावेळी उपस्थित होते.
खाजगी अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी
शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे १०-२०-३० च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीस त्वरीत परवानगी देण्यात द्यावी.जुनी पेन्शन योजना लागू करावी.अनुकंपा नियुक्तीवरील शिक्षकेतर मान्यता तात्काळ देण्यात यावी.चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीची ञुटी तात्काळ दुरुस्त करावेत.विनाअनुदानित वरुन अनुदानित पदावर केलेल्या बदलीस मान्यता देण्यात यावी.न्यायालयीन निर्णयानुसार सर्व पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतन श्रेणीलागू करावी.सरेंडर रजेचा लाभ पुर्वी प्रमाणे ग्राह्य धरावा.तसेच अर्जित रजा साठवण्याची कमाल मर्यादा काढून टाकावी.विधान परीषदेतील शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात यावा.चतुर्थ श्रेणी सेवकांचे कामाचे स्वरुप निश्चित करावे.मुलीच्या शाळेत महिला सेविका नेमण्यात यावी.यासह इतर मागण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे.तसेच या मोर्चातील मागण्याची दखल न घेतल्यास फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षावर बहिष्कार टाकण्यात येईल असेही नलगे यांनी सांगितले.
यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags :

