महाराष्ट्र
215
10
यशस्वी जीवन जगण्यासाठी नियोजन महत्वाचे- यशवंत शितोळे
By Admin
यशस्वी जीवन जगण्यासाठी नियोजन महत्वाचे- यशवंत शितोळे
स्व.दादापाटील राजळे व्याख्यानमाला पुष्प दुसरे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
स्व. दादापाटील राजळे यांच्या १०० व्या जयंती निमित्त आयोजित स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मा. श्री यशवंत शितोळे, संस्थापक,अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, कोल्हापूर, यांच्या "करिअर कट्टा- यशस्वी जीवनाचा मंत्र" या विषयावरील व्याख्यानाने गुंफण्यात आले. दादापाटील राजळे महाविद्यालय आदिनाथनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत दुसऱ्या व्याख्यानात श्री यशवंत शितोळे यांनी युवकांना त्यांच्या करिअर संबंधित मार्गदर्शन केले. करिअरचे ध्येय निश्चित करून नियोजन पूर्वक ते पूर्ण केले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. त्यामुळे नैराश्य येणार नाही. तसेच पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपला स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा.राहुल राजळे यांनी स्व दादापाटील राजळे यांच्या कार्याचा आलेख व शिक्षणाविषयी भाऊंचे विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ संचालक श्री उद्धवराव वाघ यांनी भुषवले. त्यांनी स्व. दादापाटील राजळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.किशोर गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. आसाराम देसाई यांनी मानले. यावेळी शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष मा.रामकिसन काकडे, मा.भास्करराव गोरे ,सचिव आर.जे.महाजन, प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.युवराज सूर्यवंशी, श्री आनंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषराव पवार, आबासाहेब काकडे महाविद्यालयाची प्राचार्य डॉ.मच्छिंद्र फसले, मा.बन्सीभाऊ लवांडे, मा. पोपटराव आंधळे, सुनील पुंड, रामदास म्हस्के आदी मान्यवर, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.
Tags :

