पाथर्डी तालुक्यातील व्यक्ती अपघातात जखमी, कचरागाडी चालकावर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर शहरातील कचर्याची वाहतूक करणार्या महापालिकेच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी सक्कर चौक ते आयुर्वेद कॉलेज दरम्यान घडली होती.
याप्रकरणी महापालिकेच्या वाहनवरील (एमएच 12 एसएफ 8520) चालकाविरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात जखमी झालेले अनिल नामदेव शेळके (वय 38, रा. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता शेळके व त्यांचे मेव्हणे अशोक बाबुराव शिंदे (वय 40 रा. वाळुंज, ता. पाथर्डी) दुचाकीवरून जात असताना सक्कर चौकाजवळ कचर्याची वाहतूक करणार्या गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली होती.