पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात बेकायदा दारू पकडली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथे विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दारुच्या बाटल्या पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडल्या. दारुच्या चोवीस बाटल्या व मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे.
भिलवडेत अवैध दारु विक्री करणार्यांमुळे गावची सार्वजनिक शांतता बिघडली असल्याचा आरोप करून दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांच्याकडे केली.
पोलिसांना दूरध्वनीवरून कळविले की एकजण दुचाकीवरून बेकायदा विक्रीसाठी दारू घेऊन जात आहे. पोलिस एकनाथ गर्कळ अमनदरा फाट्यावर गेले असता, एकाची झडती घेतली. एका दुचाकीवर पिशवीत दारूच्या 24 बाटल्या ठेवल्याचे आढळले. दारू घेऊन जाणारा मात्र तोपर्यंत पसार झाला. ग्रामस्थांना बेकायदा विक्रीसाठी दारू वाहिली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी गर्कळ यांनी फिर्याद दिली.