शेवगाव तहसील कार्यालय मध्ये गौणखनिज लिपिक जाधववर ५०० रुपयांची लाच प्रकरणी गुन्हा दाखल
शेवगावचा गौण खनिज लिपिक जाधव झाला अलर्ट
एसीबीचा ‘ट्रॅप’ होण्याआधीच लिपिक जाधव गेला पळून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातल्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी शेवगाव तहसील कार्यालयात छापा टाकला. मात्र तत्पूर्वीच खबर ‘लिक’ झाल्यानं शेवगाव तहसील कार्यालयातला जाधव आडनावाचा लिपिक सावध झाल्यानं कारवाईआधीच पळून गेला.
शेवगावच्या तहसील कार्यालयानं आठ दिवसांपूर्वी एका शेतकर्याची वाळूची गाडी पकडून त्याच्या जमिनीवर बोजा चढविला. मात्र ही कारवाई चुकीची झाल्याचं प्रांताधिकार्यांनी स्पष्ट केलं. संबंधित शेतकर्याला मुक्त करण्याचा आदेशही प्रांताधिकार्यांनी दिला होता. मात्र ‘आम्ही प्रांताधिकार्यांचा आदेश मानत नाही, तहसिलदारांचा आदेश मानतो. शेतकर्यानं प्रांताधिकार्यांचा यासंदर्भातला निकाल दिला, अर्जही दिला. तहससिलदारानं ‘डायरेक्शन’ आणायला सांगितलं. मात्र हे सारं
करण्यासाठी लिपिक जाधवने संबंधित शेतकर्याला पाचशे रुपयांची लाच मागितली. मात्र ती देण्यापूर्वी खबर ‘लिक’ झाली आणि लिपिक जाधव ‘अलर्ट’ झाला. मात्र नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.