अहमदनगर जिल्ह्यातील या मंञ्यावर यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे सुखादान यांचे आरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावर राजकीय द्वेषातून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख हे अन्याय करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. संजय सुखदान हे वेळोवेळी बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवत असतात. सत्ताधारी मंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा त्यांनी शंकरराव गडाख यांच्या विरोधात देखील आंदोलने, मोर्चे काढली आहेत. एक प्रबळ विरोधक म्हणून संजय सुखदान काम करत असल्याने राजकीय द्वेषातून मंत्री हे त्रास देत असल्याचा आरोप सुखदान यांनी केला आहे. मंत्री गडाख यांच्याकडून वेळोवेळी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचही सुखदान यांनी म्हटले आहे.
मंत्री गडाख यांनी मंत्री पदाचा गैरवापर करून कुटुंबावर दडपण आणत आहे. यातून नैराश्य आले असून, कुटुंबासमवेत आत्महत्या करण्याचे सुखदान यांनी यावेळी जाहीर केले. एका राजकीय पक्षाच्या नेत्यावरती जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेची नामदार यांच्या नजरेत काय किंमत असेल याची कल्पना न केलेलीच बरी असेही सुखदान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक न करता फिर्यादी वरच दरोडा विनयभंगाचा सारखे गुन्हे दाखल केले गेले. मंत्री गडाख यांच्या जाचाला वाचा फाेडण्यासाठी 1 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयासमाेर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या वेळी पत्रकार परिषदेतून देण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, संजय सुखदान, योगेश साठे, फिरोज पठाण, संजय जगताप, जीवन पारधे, अमर निर्भवणे, भाऊ साळवे उपस्थित होते.