शेवगाव- एसटी चालकाने बसमध्ये घेतला गळफास
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव आगारात उभ्या असलेल्या बसमध्ये चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी गळफास घेतला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
चालक काकडे यांनी आगारामध्ये उभ्या असलेल्या बसच्या मागील बाजूस गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच आगाराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिस पोहोचले असून पंचनामा केला आहे. गळफास घेतल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी आर्थिक कारणास्तव तणावाखाली आहेत. गेले दोन दिवस विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर उपोषण सुरू होते. संगमनेर येथील आगारात काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने गळफास घेतला होता. त्यानंतर अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या इमरतीलगत असलेल्या स्वच्छतागृहात सातारा जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी गळफास घेतल्याची स्थितीत आढळला होता.