मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रमाचे नियोजन असे असेल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हतेवर आधारित मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
प्रारुप मतदार यांद्यांची प्रसिध्दी 1 नोव्हेंबरला हाेईल. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत असेल. हे दावे 20 डिसेंबरपर्यंत निकाली काढावे लागणार आहेत. अंतिम यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध हाेईल. 1 जानेवारीला ज्यांचे 18 वर्षे पूर्ण होत असेल अशा सर्वांनी नवमतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनी फॉर्म क्रमांक 6 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडेस भरुन द्यावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला छायांकित प्रत, आधरकार्ड प्रत, रेशनकार्ड छायांकित प्रत, दोन फोटो, घरातील एका व्यक्तीचे मतदान ओळखपत्र छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
मतदार यादीमधील ज्या मतदारांचे फोटो नाहीत अशा मतदारांनी त्याचा फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडेस जमा करावेत. जे मतदार मयत, स्थलांरीत व मतदार यादीत दुबार नांव आलेले आहेत अशा मतदारांनी नमुना क्रमांक 7 फॉर्म भरुन द्यावेत, मयत मतदारांचे नातेवाईक यांनी फॉर्म क्रमांक 7 भरुन त्यासोबत मृत्युचा दाखला जोडणे आवश्यक आहे. ज्या मतदारांचे नांव, वय, लिंग व चुकीचा फोटो मतदार यांदीत दाखल करावायाचे असल्यास अशा मतदारांनी नमुना क्रमांक 8 (अ) चा फॉर्म केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडेस न चुकता जमा करावेत.
नवीन मतदार यांनी 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर वय वर्षे 18 पूर्ण झालेले आहे अशा नवमतदार यांनी नमुना क्रमांक 6 फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडेस न चुकता जमा करावेत, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांनी केले आहे.