कळसपिंप्री येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथे मा.आ.मोनिकाताई राजळे यांच्या स्थानिक निधीतुन व मा.सरपंच दिगंबर भवार यांच्या विशेष प्रयत्नातून १५ व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर विकास कामाचा ८५ लक्ष रु. भव्य शुभारंभ कार्यक्रम सोहळा दि.०१/११/२०२१ सोमवार रोजी सकाळी ०९.३० वाजता होणार आहे.
कळसपिंप्री ते आखेगाव रस्ता भुमीपुजन ( ३२.० लक्ष) हनुमान मंदिर सभामंडप भुमीपूजन(१५.० लक्ष) ,दलितवस्ती सिंमेट रस्ता( १३.५ लक्ष) , जि.प.शाळा खोली भुमीपूजन(८.७५ लक्ष) ,१५ वित्त आयोग विविध विकास कामे व इतर कामे(१५.लक्ष)
मा.आ.मोनिकाताई राजळे यांच्या शुभहस्ते व जिल्हा परीषद सदस्य राहुल राजळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी सभापती सुनिता दौंड , उप सभापती मनिषा वायकर , विष्णूपंत अकोलकर, चंद्रकला खेडकर, पंचायत समिती सदस्य सुनिल ओहोळ, सुभाष केकाण,सुनिल परदेशी,राहुल गवळी,
भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर , महीला भाजप तालुकाध्यक्ष काशिताई गोल्हार,सौ.गंगुबाई आटकर,
गटविकास अधिकारी शितल खिंडे,विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,विस्तार अधिकारी श्री. शेळके , विस्तार अधिकारी श्री. गहिरे ,जिल्हा परीषद उपविभाग श्री. सानप , शाखा अभियंता श्री.काकडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन कळसपिंपरीचे सरपंच व उपसरपंच,सदस्य ग्रामविकास अधिकारी ,वि.का.से.सो.चेअरमन,सचिव ,सदस्य तसेच सर्व
ग्रामस्थ यांनी केले आहे.