पाथर्डी- जनावरे आठवडे बाजार रद्द
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी मुख्य बाजार ,उप बाजार आवार व कार्यक्षेञातील सर्व बाजार घटक जनावरे व्यापारी यांना कळविण्यात येते की, मा. मुख्याधिकारी नगर परीषद पाथर्डी यांचे कडील आदेश जावक क्रमांक / आस्थापना /५६०/ सन २०२१ दिंनाक ०८/१०/२०२१ नुसार कोरोना विषाणू (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आठवडे बाजार बुधवार या दिवशी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी १३/१०/२०२१ पासून पुढील आदेश निघेपर्यत आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत आहे.याची सर्व बाजार घटकांनी नोंद घ्यावी.
असे आवाहन सचिव श्री.दि.अ.काटे , उप सभापती सौ.मं.रा.गर्जै ,श्री. ब.तु.आठरे तसेच सर्व संचालक मंडळ कृषि उत्पन्न बाजार समिती,पाथर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.