अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान विभागामार्फत दि. 9 / 10 / 2021 ते दि. 10 / 10 / 2021 कालावधीत वीजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी व वीजा पडणेची शक्यता वर्तवीलेली आहे. दि. 9/10/2021 रोजी दुपारी 12.00 वा. अहमदनगर जिल्हयातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नाशिक जिल्हयातील नांदुरमधमेश्वर बंधा-यातून 6,310 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे व भिमा नदीस पुणे जिल्हयातील विविध धरणांच्या विसर्गामुळे दौंड पुल येथे 8,222 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच जिल्हयातील भंडारदरा धरण व निळवंडे धरणातून पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. तर ओझर बंधा-यातून प्रवरा नदीपात्रात 1,093 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. *मुळा धरणातून मुळा नदीपात्रात सदयस्थितीत 4,255 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.* घोड धरणातून घोड नदीपात्रात 5,400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सिना धरणातून सिना नदीपात्रात 6,22 क्युसेस व खैरी धरणातून 4,68 क्युसेस विसर्ग सुरू आहे. जिल्हयातील पर्जन्यमानामुळे वा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हयातील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे.