पाथर्डी- खड्ड्यात वृक्षारोपण करुन केले आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथे NH 61 हायवे जीवघेणा झाला आहे हा रस्ता गेली 5 वर्षा पासुन रखडलेला आहे. या रस्त्यावर अपघातामध्ये सुमारे २०० ते ३०० लोकांनी आपले प्राण गमावले आहे. हा रस्ता एक मृत्यूचा सापळा झाला आहे रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. भररस्त्यात अनेक ठिकानी मोठ मोठे २ ते ३ फुट खोल खड्डे पडले असून त्यामधुन टु व्हिलर, छोटी वाहने यांना तर कसरतच करावी लागते त्यामुळे या रस्त्याला नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्या वरील जीवघेणा प्रवास प्रवास कधी संपेल असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले. आता तरी प्रशासनाला जाग येईल या अवस्थेला अहमदनगर दक्षिण चे खासदार जबाबदार आहेत असा आरोप गावकऱ्यांनी केल्याने नगर दक्षिणच्या खासदारांना घरचा आहेर मिळाला आहे.
या आंदोलनात भाजपा तालुका अध्यक्ष माणिक मामा खेडकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव सचिन बाबासाहेब पालवे, फुंदे टाकळी चे सरपंच सचिन फुंदे, उपसरपंच कल्याण फुंदे सर, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण फुंदे सर, पंढरिनाथ मेजर फुंदे, भागिनाथ फुंदे, समाजसेवक भद्रीनारायण फुंदे, चेअरमन नवनाथ आंण्णा फुंदे यांनी सहभाग घेतला होता.