कुटुंबावर हल्ला करुन घर जाळले,मुलाचा मृत्यू
नगर सिटीझन live प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पारनेर (ता. पाटोदा) गावाजवळील पारधी कुटुंबावर हल्ला करून तेथील नागरिकांना काठ्यानी अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच या कुटुंबाचे घरही जाळून टाकले. या मारहाणीत मानु उर्फ सिद्धांत अरूण काळे या एक वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर काठीचा मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला. तर अनेक जण गंभीर असून बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच जामखेड येथील वंचीत बहुजन आघाडीचे भटके-विमुक्तांचे राज्य समन्वयक ॲड. अरुण जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.