रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना पोलीसांकडून अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - गुरुवार 06 एप्रिल 2021
कोरोनाच्या काळात एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले जात असताना रेशनिंगच्या मालाचा काळाबाजार करणाऱ्या तीन इसमासह
82 गोण्या तांदूळ, 8 गोण्या गहू आणि 2 पीकअप वाहने असा 10,44,000 रु चा माल पोलिसांनी राशीन येथे
जप्त केला आहे.
आज दि. 4 मे रोजी कर्जत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की करमाळा तालुक्यातील काही इसम हे रेशनिंगचा तांदूळ आणि गहू नागरिकांना न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करणार आहेत. या माहीतीच्या आधारे दु 2 वा. राशीन येथील कर्जत रोडवरील सागर हॉटेल समोर दोन टेम्पोना पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये बाळासाहेब दादासाहेब ढेरे (वय 25 वर्ष), रेवणनाथ मुरलीधर ढेरे (वय 39 वर्ष), श्रीकांत प्रकाश ढेरे (वय 25 वर्ष) सर्व रा. विट ता.करमाळा यांना ही ताब्यात घेण्यात आले. त्यांना या बाबत विचारपूस केली असता सदरचा माल हा रेशनिंगचा असून काळ्या बाजारात विक्री करणार होतो असे कबूल केले. त्यांचेकडून 55 किलोग्राम वजनाच्या 72 गोण्या तांदूळ आणि 8 गोण्या गहु व हा माल वाहून नेणारे MH12-SF-9473 आणि MH16-AY-3858 या क्रमांकाचे दोन चारचाकी टेम्पो ही वाहने असा एकूण 10 लाख 44 हजार रू किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर ची कारवाई
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उप निरीक्षक भगवान शिरसाठ, पो, हवालदार तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, संभाजी वाबळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देविदास पळसे, शाहूराज तिकटे, यांनी केली असून
सदर कारवाई कामी करमाळा तहसीलदार समीर माने, कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, तलाठी प्रशांत गौडचर यांची मदत झाली. पुढील तपास पो उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करत आहेत.