अज्ञात व्यक्तीने तणनाशक औषध फवारुन फळबागाचे केले नुकसान 'या' गावात घडला प्रकार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - गुरुवार 06 मे 2021
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी- पाडळी रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीने एका शेतक-याच्या शेतातील (दि.०५) रोजी दुपारी दोनच्या सुमारास ४ झाडांवर तणनाशक मारून झाडे जाळलेली आहेत. अशा विकृतीखोर(संशयित) कोणाच्या पाहण्यात आले असेल तर कृपया कळवावे. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.असे व्ही.आर. गायकवाड यांनी सांगितले. सदर प्रकाराबाबत वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक श्री कुशीनाथ बर्डे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्री. सुभाष बर्डे, श्री. बाबासाहेब घुले, श्री. विठ्ठल बावणे, श्री. अशोक बावणे, श्री. राजू घुले आदींनी हळहळ व्यक्त केली.
तसेच या अगोदरही
दि.२७/०४/२०२१ रोजी पहाटे अशाच प्रकारे या शेतामध्ये कांद्याच्या उरळी जवळील सीताफळ आणि पपई या झाडांवर तणनाशक किंवा तत्सम औषध मारून १३ झाडांचे नुकसान अज्ञाताने केलेले होते.
अशा प्रकारची घटना शेतामध्ये घडत आहे.तसेच अशी विकृती करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई होणे गरजेचे आहे.असे मत नुकसान झालेल्या शेतक-याने व्यक्त केले आहे.