पाथर्डीतील भेसळयुक्त दुधावर छापा,अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान येथून मे.विवेकानंद दुध संकलन केंद्र यांनी संकलित केलेले ९५० लिटर भेसळयुक्त दुध अहमदनगर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी नष्ट केले आहे.
सोमवारी १० ऑक्टोबर २०२२ रोजी पाथर्डी येथून शेवगाव तालुका दुध संघाच्या जागेतील मे.सनफ्रेश एग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.शेवगाव एम.सी.सी, शेवगाव येथे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अचानक करण्यात आलेल्या तपासणीत विक्रीसाठी आलेल्या दुध संकलकांची तपासणी केली असता मे.विवेकानंद दुध संकलन केंद्र, विर सावरकर मैदान, पाथर्डी, मालक ज्ञानदेव शहादेव घुले यांनी तेथे विक्रीसाठी आणण्यात आलेले ९५० लिटर गाय दुध भेसळयुक्त असल्याचे संशयावरुन अन्न व औषध प्रशासनाने अन्न नमुना सदरील दुध घेउन नष्ट केले आहे. ज्ञानदेव शहादेव घुले हे अत्यंत खराब व आतल्या बाजुस किटन आलेल्या प्लास्टीकच्या कॅन्समध्ये दुध संकलित करुन त्याची विक्री करत असल्याचे आढळून आले तसेच सदर गाय दुधाची इंडीफॉस मशिनवर चाचणी केली असता त्यात साखरेचे प्रमाण असल्याचे आढळून आले व सदर दुधाची आम्लता ही वाढलेली
असल्याचे आढळून आले होते.सदर दुधाचा नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्या नंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.