एसटीच्या बस चालक, वाहकास दिली जिवे मारण्याची धमकी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव-कांबी मुक्कामी बस घेऊन जात असताना लखमापुरी बसथांब्यावर चालक व वाहकाला तिघांनी शिवीगाळ करुन माराहण करत जिवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना सोमवारी (दि.10) रात्री 7.15 वाजता घडली.
याबाबत चालक संदीप नारायण जाधव (रा.आव्हाणे बुद्रुक, ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी महादेव रावसाहेब मातंग, शुभम मनोहर पवार (दोघे रा. लखमापुरी, ता. शेवगाव) व संतोष शेजवळ या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे
सोमवारी चालक संदीप जाधव व वाहक शंकर कोळगे हे शेवगाव येथून एसटी बस (क्रमांक एस.एच.40 वाय.5442) घेऊन कांबी मुक्कामी जात होते. रात्री 7.15 च्या दरम्यान लखमापुरी येथे बसथांब्यावर विद्यार्थी उतरविण्यास बस थांबली होती. त्यावेळी बस उशिरा का आणली, असा प्रश्न उपस्थित करीत मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.