महात्मा फुले हे खरे शिक्षणाचे अग्रदूत- प्राचार्य शेषराव पवार
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे श्री आनंद महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त "महात्मा जोतिबा फुले यांचे जीवन व कार्य "या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करून महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रा.डॉ.अमोल महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी विद्यार्थ्यांना म.फुले यांच्या सामाजिक ,शैक्षणिक, स्त्री सुधारणा, विषयी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा फुले यांचे विचार,हंटर कमीशनर, सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या प्रथम शाळे विषयी माहिती देऊन म.फुले हे शिक्षणाचे खरे अग्रदूत आहे, हे विद्यार्थ्यांनात सांगीतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश बुधवंत यांनी केले. तर प्रा. डॉ.विजयकुमार जगदाळे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ.विकास गाडे,प्रा. डॉ.मुकतार शेख . प्रा .डॉ.भाऊसाहेब घोरपडे आदी उपस्थित होतेण.तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.