महाराष्ट्र
ग्रामीण भागातील मुले शिक्षण प्रवाहात तालुक्यामध्ये प्रथम- प्राचार्य संपतराव दसपुते
By Admin
ग्रामीण भागातील मुले शिक्षण प्रवाहात तालुक्यामध्ये प्रथम- प्राचार्य संपतराव दसपुते
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह,शेवगावचे शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहरटाकळी, ता. शेवगाव, जि. अ.नगर येथे इ.5 वी,6 वी,8 वी व 9 वी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक संघटने मार्फत घेतलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत राज्यप्रज्ञा पात्र होण्याचा बहुमान मिळालेल्या विद्यालयातील व परीक्षेतील गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार समारंभ विद्यालयात संपन्न झाला.
उपस्थित अतिथींचे स्वागत करण्यात आले.
कु.विद्या कोल्हे,चि.श्रेयस घनवट,चि.आर्यन अडकित्ते,चि.काळे यशदिप व चि.जिवडे सिद्धांत हे परीक्षेतील राज्यप्रज्ञापात्र विद्यार्थी व परीक्षेतील 115 विद्यार्थ्यांचा विद्यार्थी यांचा पालकांसह गौरवपदक,प्रशस्तीप्रत्रक व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संपतराव दसपुते,श्री.अनिल मगर,श्री.संजय मरकड,श्री.बाळकृष्ण ठोबंळ,श्रीम.रेखा आढाव,श्रीम.मोहिनी बढदे व श्री.सुर्यवंशी शशिकांत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य संपतराव दसपुते यांनी आपल्या मनोगतात या गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आहे. त्यांचा पालकांसोबत आज सन्मान होत आहे ही या विद्यालयाची व संस्थेची भूषणावह बाब आहे.विद्यार्थ्यांनी स्वतः घेतलेले कष्ट , शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य त्याचे हे फळ आहे. या कोरोना काळात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासमोर ऑनलाइन शिक्षणाचे व स्पर्धा परीक्षेचे खूप मोठे आव्हान होते हे आव्हान स्विकारून अशा प्रकारचे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. याचा अभिमान वाटतो. शैक्षणिक प्रक्रिया पद्धती, शिक्षण प्रवाह यामध्ये बदल होत आहेत .दिवसेंदिवस नवनवीन आव्हाने समोर येत आहेत त्यासाठी आपली गुणवत्ता वाढवावी लागेल आणि अशा शालेय जीवनातील या परीक्षा पुढील येणाऱ्या मोठ्या परीक्षांचा पाया आहे. या स्पर्धा परीक्षेत आपल्याला सिद्ध करून दाखवावे लागेल. आपल्या ध्येयापर्यंत जायचे आहे त्या परीक्षेचे, यशाचे हे मैलाचे दगड आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवून दाखवले आहे .त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. विविध शाळेतील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास घडवण्याचे काम या विद्यालयातून होत आहे. असे मत व्यक्त करून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
पर्यवेक्षिका अंजली चिंतामण व पालक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता दारकुंडे , सूत्रसंचालन अलका भिसे, आभार दिपक बोडखे यांनी व्यक्त केले.
यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, इ.५ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यां समवेत पालक उपस्थित होते.
Tags :
55
10