शेवगावमधील पॉस्को, विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव येथील पोस्को,अॅट्रोसिटी व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी कृष्णा कापकर याला अहमदनगर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला आहे.शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये बालकाचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियमचे कलम ८ व १२ आणि अनुसूचित जाती,जमाती अधिनियम कलम, भारतीय दंड संहिताचे कलम ४५२,३४२,३५४ अ,३२३,५०६ अन्वये एका महिलेने १४ डिसेंबर २०२२ रोजी आरोपी कृष्णा कापकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर गुन्ह्याची माहिती मिळताच आरोपीला अटक करून जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे हजर करण्यात आले होते.आरोपीला पोलीस पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडीचा आदेश देण्यात आला होता.त्यानंतर आरोपीने जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक सहा अहमदनगर यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता.सदर अर्जामध्ये अॅड.शर्मिला यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक ६ यांनी ११ जानेवारी रोजी जामीन मंजूर केलेला आहे.आरोपींच्या वतीने अॅड.शर्मिला यांनी काम पाहिले.