निवृत्ती महाराज इंदुरीकर केले आ.निलेश लंकेचे समर्थन,पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
‘कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो, तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,’ असे इंदुरीकर यांनी म्हटले आहे. आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सध्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. कीर्तनासाठी निवृत्त महाराज इंदुरीकरांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कीर्तनातून इंदुरीकर यांनी आमदार नीलेश लंके यांचे कौतुक केले आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांना ही ऑडिओ क्लिप टारगेट करते. याचा फायदा विराेधकांनी घेत आमदार लंके यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहेत. लंके यांना पाठिंब्यासाठी मतदार संघातून काही युवती, संघटना पुढे आल्या आहेत, तर देवरे यांच्या पाठिंब्यासाठी देखील राजकीय, सामाजिक तसेच त्यांची तहसीलदार संघटना सरसावली आहे. त्यातच कीर्तनकार इंदुरीकर यांनी लंके यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
इंदुरीकर म्हणाले, ‘राज्यातील बहुतांश आमदार-खासदार साखर कारखाने, शिक्षण संस्था चालवितात, तर कोणी उद्योगपती आहेत. मात्र, त्यांना कोणाला असे सेवाभावी वृत्तीचे कोविड सेंटर उभारण्याचे सुचले नाही. ते काम लंके यांनी केले. या कामाची दखल देश-विदेशात घेतली गेली. भाळवणी येथील कोविड सेंटरमधून २२ हजार रुग्णांना बरे करणारे आमदार लंके हे देवदूत आहेत. लंके यांना हजाराे जणांचे आशीर्वाद लाभत आहे. याच आशीर्वादाच्या जोरावर लंके पुढील २५ वर्षे राजकारणात सहज टिकून राहतील’, असेही इंदुरीकर म्हणाले.