गावठी पिस्तुलातून गाेळीबारात एक जण जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे गावठी पिस्तुलातून गाेळीबाराची घटना घडली. पप्पू पातकळ ऊर्फ परमेश्वर (वय- २६, रा. चापडगाव) यांच्या दिशेने हे गाेळीबार झाल्याची माहिती मिळते. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पातकळ यांच्यावर एक गोळी झडली, ती गोळी त्याच्या हाताला चाटून गेल्याने त्यात ते जखमी झाले आहेत. त्यानंतर हल्लेखाेरांनी तेथून पळ काढताना आणखी एक गाेळीबार हवते केला. शेवगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी शेवगावमध्ये धावा घेतली आहे.
हा हल्ला वाळू चाेरीच्या अवैध धंद्यातून झाला की जुन्या एखाद्या वादातून याचा नेमका उलगडा झालेला नाही. शेवगाव तालुक्यातील अवैध वाळुचा उपसा करून त्याची विक्री करण्यासाठी सध्या आघाडीवर आहे. वाळू चाेरीच्या अनेक टोळ्या तालुक्यात असून, त्यात गटबाजी उफाळते आहे. या टाेळ्यांना काही राजकीय कार्यकर्त्यांचे बळ आहे. या टाेळ्यांमध्ये गावठी पिस्तुलाचा वापर वाढला आहे. शेवगावमध्ये अहमदनगर, औरंगाबाद, जालना, साेलापूरमधील गुन्हेगारांचा वावर आहे. या गुंडांकडून पोलिसावर देखील हल्ले झाले आहेत. वाळू चाेरीतून पाेलिसांची हत्येचा देखील गंभीर प्रकार घडले आहेत.