बापाच्या नादाला लागल्या तर दोघींना गोळ्या घालेन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वडिल आईला मारहाण करत असताना सून सासूच्या मदतीला धावली. बाजुलाच असलेल्या मुलाने पत्नीला मदतीला आली म्हणून मारहाण केली. माझ्या वडीलांच्या नादी लागल्या तर दोघींना गोळी घालून जिवे मारून टाकीन अशी धमकी त्याने आई आणि पत्नीला दिली.
पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथे ही घटना घडली. आईच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसात बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारित्र्यावर संशय घेवून पतीने पत्नी व सुनेला शिवीगाळ केली.
पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण केली. सासूच्या मदतीला सून धावली. दोघांचे भांडण ती सोडवित होती. सासरा घरातून लायसन्सचा पिस्तूल घेवून आला. त्याने पिस्तूलच्या मुठीने पाठीत सासूला मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना पिडीतेचा मुलगा हा तेथे आला. 'तू कशाला मध्ये पडली' असे म्हणून त्याने त्याच्या पत्नीला मारहाण केली. सासूने मुलाच्या मारहाणीतून सुनेची सुटका केली. मुलाने घरातून गावठी कट्टा (पिस्तूल) आणला. आई, पत्नीला दाखवत म्हणाला, ' परत माझ्या वडीलांच्या नादी लागल्या तर दोघींना गोळी घालून जिवे मारून टाकीन' अशी धमकी दिली.
अन् तो कट्टा पोलिसांना दिला
बापाकडे लायसनधारी पिस्तुल तर मुलाकडे गावठी कट्टा असल्याने सासू-सून प्रचंड घाबरल्या होत्या. जीव मुठीत धरून त्यांनी घरात कसाबसा एक दिवस काढला. दुसर्या दिवशी मंगळवारी घरातील गावठी कट्टा घेवून त्या पोलिसांत पोहचल्या. तो कट्टा पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांनी फिर्याद दिली.