महाराष्ट्र
सामूहिक हत्याकांडात नवा ट्विस्ट, पुरलेले 3 मृतदेह पुन्हा उकरले, हत्येचं
By Admin
सामूहिक हत्याकांडात नवा ट्विस्ट, पुरलेले 3 मृतदेह पुन्हा उकरले, हत्येचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चुलत भावडांनीच आपल्या भावाचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त केल्याचा हा प्रकार समोर आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील निघोज गावातील रहिवासी असलेल्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सहा दिवसातं पुण्याच्या दौड तालुक्यात नदीत सापडले होते.
मृत मोहन पवार यांच्या चुलत भावाने मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणात अशोक पवार याच्यासह चार भावांना अटक करण्यात आलेली आहे.
पुणे - पुणे जिल्ह्यांत दौड येथील पारगावमध्ये भीमा नदीच्या पात्रात एकापाठोपाठ एक सात मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. सुरुवातीला हे मृत्यू बुडून झाल्याचं समोर आलं होतं, नंतर तपासात हे मृत्यू बुडून नव्हे तर सामूहिक हत्येचा प्रकार असल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर खळबळ उडाली होती. हत्या का करण्यात आल्या त्या कारणांचा शोध अद्याप पोलीस घेतायेत. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. भीमा नदीत सापडलेल्या 7 मृतदेहांपैकी 3 मृतदेहांचं पुन्हा पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे. त्यासाठी हे मृतदेह ज्या ठिकाणी पुरण्यात आले होते, त्या जागेवरुन हे मृतदेह पुन्हा उकरण्यात आलेत. पुणे जिल्हा रुग्णालयानं पहिल्यांदा दिलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये या तिघांचा मृत्यू बुडून झाल्याचं सांगितलं होतं. मात्र आता या हत्या असल्याचं समोर आल्यानंतर हत्येचं कारण आणि हत्या कशी करण्यात आली, याचा तपास पुन्हा करण्यात येतोय. चुकीचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.
कुठले डॉक्टर अडचणीत ?
8 जानेवारी ते 21 जानेवारीच्या काळात हे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. त्यानंतर हे मृतदेह यवतच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी या सगळ्यांचा मृत्यू बुडून झाल्याचं सांगितलं होतं. नंतर सापडलेल्या मृतदेहांचं पोस्टमार्टेम हे पुण्याच्या ससून रुग्णालयात करण्यात आलं. त्यात एका अहवालात ही हत्या असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.
नमेकं कसं घडलं हत्याकांड ?
चुलत भावडांनीच आपल्या भावाचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त केल्याचा हा प्रकार समोर आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील निघोज गावातील रहिवासी असलेल्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सहा दिवसातं पुण्याच्या दौड तालुक्यात नदीत सापडले होते. मृत मोहन पवार यांच्या चुलत भावाने मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणात
अशोक पवार याच्यासह चार भावांना अटक करण्यात आलेली आहे.
हत्या नेमकी कशामुळे हे अद्यापही अस्पष्ट
हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आलेली असली तरी हे हत्याकांड नेमकं कशामुळं झालं, याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवल्याचा प्राथिमक संशय पोलिसांना आहे. त्याच बरोबर यात करणी आणि प्रेमसंबंध याही कारणांची चर्चा आहे. आता या आरोपींच्या चौकशीत यातील सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. तसचं या सातही जणांची हत्या नेमक्या कशाप्रकाराने केली, हेही आता नव्या पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Tags :
24068
10