पंचायत समिती सभापती सुनिता दौंड यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला.
पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनिता गोकुळ दौंड यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांचेकडून आरोग्य विभागासाठी पंचायत समिती अंतर्गत खरवंडी कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका देण्यात आली आहे. यासाठी सभापती दौंड यांनी शासनाकडे पाठपुरावा करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पंचायत समिती सभापती यांच्या हस्ते पार पडला.
खरवंडी कासार आरोग्य केंद्र अंतर्गत बारा वाड्या- वस्त्या असल्याने तसेच जास्त लोकसंख्या असल्याने त्या ठिकाणी रुग्णांची, गरोदर मातांची व अपघात ग्रस्त रुग्ण यांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिका नसल्याने त्यांची गैरसोय होत असे, म्हणून सभापती दौंड यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी खरवंडी कासार परिसरातील कार्यकर्ते मिथुन डोंगरे, वामनराव कीर्तने, दादासाहेब खेडकर, नवनाथ उगलमुगले, शैलेंद्र जायभाये तसेच खरवंडी कासार परिसरातील कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.