पुराच्या पाण्यात पिकअप व्हॅनसह तीनजण वाहून गेले;एनडीआरएफ'चे शोध कार्य सुरू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील आश्वि गावामध्ये पिकप फॅन मध्ये काचा घेऊन आलेल्या पिकप व्हॅन मधील तिघेजण प्रवरा नदीवरील जोर्वे गावानजीक पुलावरून नदी मध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या पिकअप व्हॅनमधे ड्रायव्हरसह इतर दोघेजण असल्याचं सांगण्यात येत आहे.
संगमनेर : नाशिकहून संगमनेर तालुक्यातील आश्वि गावामध्ये पिकप फॅन मध्ये काचा घेऊन आलेल्या पिकप व्हॅन मधील तिघेजण प्रवरा नदीवरील जोर्वे गावानजीक पुलावरून नदी मध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पिकअप व्हॅनमधे ड्रायव्हरसह इतर दोघेजण असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे तिघेजण आश्वि गावामध्ये संदीप नागरे यांच्याकडे काचाखाली करून नाशिककडे परत जात असताना प्रवरा नदीला प्रचंड पूर असताना वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये गाडी चालक प्रकाश याच्यासह इतर दोघेजण असल्याचं सांगण्यात येत आहे. ही पिकअप व्हॅन नाशिक येथील असलम अली खान यांची असून त्यांच्या (एम एच १५ एफ वी ८९४३) या पिकअप व्हॅनवर प्रकाश (राहणार जालना) हा चालक होता. या पिकप फॅनमध्ये काचा घेऊन हा वाहनचालक संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आलेला होता. रात्री काचा खाली करून हा परत जात असताना अशी आश्वी बुद्रुक पुढे जोर्वे नजीक येथे एका पुलावर प्रवरा नदीला प्रचंड पूर परिस्थिती असताना ही पिकअप व्हॅन प्रवरा नदीमध्ये जवळपास ५० ते ७५ फूट खाली कोसळली आणि या पुरामध्ये चालक प्रकाश व इतर दोघेजण या पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान ही माहिती समाज माध्यमात पसरल्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह पथकाने शोधकार्य सुरू केले आणि त्यानंतर एनडी आरएफ चे पथक हे शोध कार्य सुरू करत असून, प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी याबद्दल शोध कार्य सुरू केले आहे.