महाराष्ट्र
11677
10
सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रविण काजळे
By Admin
सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रविण काजळे यांचा ऐतिहासिक विजय!
४८७ पैकी ४२९ मते मिळवत दणदणीत विजय; १२ तालुक्यांत प्रथम पसंती
नगर सिटीन्युज 24 live टिम प्रतिनिधी
अहिल्यानगर- : महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटना, अहिल्यानगर जिल्ह्याच्या त्रैवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी प्रविण श्रीराम काजळे यांनी ऐतिहासिक बहुमत मिळवत दणदणीत विजय संपादन केला. त्यांना एकूण ४८७ पैकी तब्बल ४२९ मते मिळाली. जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी १२ तालुक्यांत प्रथम पसंतीची मते मिळवत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली.
संघटनेच्या घटनेनुसार क्रमदेय मतदान पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सहाय्यक कृषी अधिकारी संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदानात सहभाग नोंदविला.
राज्य कार्यकारिणी सदस्य पदासाठी युवराज जालिंदर शिंगटे यांनी ४८७ पैकी ३६८ मते मिळवून विजय मिळविला. तर इतर पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने व बिनविरोध झाली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पडली.
नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
१. प्रविण श्रीराम काजळे – जिल्हाध्यक्ष
२. युवराज जालिंदर शिंगटे – राज्य कार्यकारिणी सदस्य
३. प्रतिक प्रल्हाद कांबळे – जिल्हा कार्याध्यक्ष
४. गोरक्षनाथ आबासाहेब पठाडे – जिल्हा उपाध्यक्ष-१
५. मोनिका संभाजी गांगर्डे – जिल्हा उपाध्यक्ष-२
६. गणेश बबन भराट – जिल्हा उपाध्यक्ष-३
७. विठाबाई चंदर मदेवाड – जिल्हा उपाध्यक्ष-४
८. विजय तुकाराम साबळे – जिल्हा सचिव
९. संतोष चिंधू साबळे – जिल्हा खजिनदार
१०. मंगेशकुमार सखाहरी बनकर – जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
११. प्रांजली भारत कवडे पाटील – जिल्हा महिला प्रतिनिधी
१२. राजेश सुंदरलाल प-हे – जिल्हा संघटक
१३. निलेश प्रल्हाद ढाकणे – जिल्हा संघटक
१४. स्नेहल रावसाहेब चौधरी – जिल्हा संघटक
१५. संदीप अरविंद बडे – जिल्हा संघटक
या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. नितीन सोनवलकर, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. उमेश कदम यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मावळत्या कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष श्री. जयवंत गदादे, श्री. चंद्रकांत तांदळे आणि श्री. अजिनाथ कुंढारे यांनी विशेष सहकार्य केले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रविण काजळे व सर्व कार्यकारिणी सदस्यांचे जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Tags :
11677
10




