पाथर्डी -तालुका
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परीसरात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे टॕकर, ट्रंक,टॕक्टर वाहनाचा सुळसुळाट चालू आहे.रस्त्यावर दिवस राञ वाहने चालू आहेत.याकडे प्रशासकीय यञंणा बघ्याची भुमिका घेत आहे.याकडे ग्रामपंचायत यञंणेने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.रस्त्याने ये-जा करणारी लहान मुले ज्येष्ठ नागरिक रस्त्याने ये-जा करतात परंतु या मोठ्या वाहनाची भिती वाटत आहे.वाहन समोरून दिसताच काहीचा बीपी शुगर वाढते.काहीना वाटते की यम आला वाटतं,काही ना वाटत मरतोय आता टॕकर अंगावर येऊन,चेगांरतो की काय आता भिती
एवढे मोठे पाण्याचे टॕकरने मोठी जीवित हानी होवू शकते.खूप वेगाने ही वाहने रस्त्याने चालतात.आणि आपले जबाबदार प्रशासन फक्त पाहतात.किती मोठी शोकांतिका दिसते.प्रशासन ग्रामपंचायत तसेच तालुका पाणीपुरवठा यञंणा,भुजल पातळी सर्वैक्षण विभाग,लोक प्रतिनिधी .यांनी गावात पाणी विकणा-या व्यक्तीची मिटींग घेऊन योग्य ती कार्यवाही करावी कारण एकतर लोकांना रस्त्याने चालताना टॕकरची भिती आणि गावातील शेतकऱ्यांना दुसरी भिती म्हणजे विहीरी कोरड्या पडण्याची शक्यता आहे.कार हे पाण्याचे टॕकर,ट़क जिथे भरतात त्या शेजारच्या विहीरी कोरड्या पडण्याची शक्यता आहे.आणि गाव रस्ता पुर्णपणे खराब झाला आहे.याकडे प्रशासन यञंणा यांनी विशेष लक्ष घालावे.ग्रामस्थांची मागणी होत आहे.शेतकरी चिंतेत आहे.कारण विहीरी तळाला गेल्या कारण शेजारच्या विहीरीतील पाण्याचा टॕकरने उपसा होत आहे.