महाराष्ट्र
20723
10
समृद्धी महामार्गावर ट्रकसह गुटख्याचा साठा पकडला
By Admin
समृद्धी महामार्गावर ट्रकसह गुटख्याचा साठा पकडला
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क-
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने नागपूरहून मुंबईकडे गुटखा घेऊन जाणारा आयशर ट्रक पकडला. यावेळी पथकाने आरोपीसह १७ लाख २८ हजारांच्या गुटख्यासह आयशर ट्रक असा ६९ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक विशेष पथक तयार करून त्यांना कारवाईसाठी रवाना केले होते. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी हे पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या
हद्दीत गस्त घालायला गेले असता, समृद्धी महामार्गावरून एका आयशर ट्रकमधून गुटखा आणि पानमसाल्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेली माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी
किरण धन्यकुमार जगदाळे यांना देण्यात आली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सापळा रचला. यावेळी आयशर ट्रक (डीडी-०१-एए-९५४४)
तिथे आल्यानंतर पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व सुवासिक तंबाखू मिळून आल्याने वाहन चालक दिनेश रामचंद शर्मा (वय ४७, रा. घर नं. ४७२ बी, द्वारकापुरी, इंदौर, मध्यप्रदेश) यास
६८.२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त
समृद्धी महामार्गावर केलेल्या कारवाईत आयशर ट्रकमधून २७लाख रुपयांची प्रिमीयम राजनिवास सुगंधित पानमसाल्याची १८ हजार पाकिटे, १७ लाख २८ हजार रुपयांची सुगंधीत तंबाखूची १८ हजार पाकिटे आणि २५ लाख रुपयांचा आयशर ट्रक असा एकूण ६९ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत ट्रकमधून २७ लाख रुपयांची प्रिमीयम राजनिवास सुगंधीत पानमसाल्याची १८ हजार पाकिटे, १७ लाख २८ हजार रुपयांची सुगंधीत तंबाखूची १८ हजार पाकिटे आणि २५ लाख रुपयांचा
आयशर ट्रक असा एकूण ६९ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला व जप्त केलेल्या मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिरेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, अभिजीत अरकल, अरुण गांगुर्डे, रणजीत जाधव, अजिनाथ पाखरे, विशाल तनपुरे, बाळासाहेब गुंजाळ व दीपक जाधव यांच्या पथकाने पार पाडली आहे.
Tags :
20723
10




