अज्ञात व्यक्तीकडून शेतातील पॕपलाईनने औषध तणनाशक शेतात टाकून शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान
पाथर्डी तालुका न्यूज नेटवर्क-
पाथर्डी तालुक्यातील जवखेड दुमाला येथील कांदा उत्पादक शेतकरी यांनी आपल्या शेतात एक एकर कांदा रोप आहे.कांदा रोप अतिशय जोमाने वाढलेले आहे.परंतु एका अज्ञात व्यक्तीने शेतकरी श्री. पंडीत भानुदास नेहुल यांच्या शेतातील कांदा रोपामध्ये असलेल्या शेतातील पॕपच्या बा-यामध्ये तणनाशक औषध टाकल्याने ते शेतातील कांद्याच्या रोपात पसरले यामुळे शेतातील एक एकर कांदा रोपाचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या सतत दोन वर्षापासुन असे कृत्य अज्ञात व्यक्ती करत आहे.
अगोदरच शेतकरी दुष्काळाच्या परीस्थितीला कंटाळून गेला आहे.जेमतेम विहीरीला काही प्रमाणात पाणी आहे.त्या पाण्यात शेतकरी कांदा पीक घेण्याच्या तयारीत आहे.अशातच शेजारील आसपास परीसारातील शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांचे विनाकारण नुकसान करत आहेत.ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.असे कृत्य करणारे व्यक्ती नेमक्या कोणत्या प्रवृत्तीचे आहेत.समाजात अश्या लोकांना काय मिळते दुसऱ्याचे नुकसान करुन ही एक खेदजनक बाब आहे.गावातील अशा व्यक्तीचा ग्रामपंचायत स्तरावरील कृषि समिती तसेच गावचा प्रमुख म्हणून सरंपच तसेच ग्रामसेवक यांनी अशा व्यक्तीचा शोध घेऊन ग्रामस्तरावर योग्य ती कार्यवाही करावी.किंवा तालुका कृषि अधिकारी पथक यांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांची समस्या जाणून घ्यावी.तालुका पोलिस पथक यांच्याकडे तक्रार अर्ज तालुका कृषि अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी करुन दाखल करावा अशी मागणी सदर शेतकरी पंडीत भानुदास नेहूल यांच्याकडून होत आहे.