महाराष्ट्र
537
10
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील मराठा समाजाचे प्रश्न तातडीने सोडवा -लबडे
By Admin
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील मराठा समाजाचे प्रश्न तातडीने सोडवा -लबडे
शेवगाव: मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाज, शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या वतीने मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये कुणबी नोंद असलेल्या पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देताना होणारी अडवणूक थांबवावी, जुन्या शासकीय अभिलेखांमध्ये कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी नोंद असलेल्या नागरिकांच्या प्रकरणांचा पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने निपटारा करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची जात वैधता झालेली असल्यास, त्याच्या सख्ख्या भावाला शपथपत्र, पूर्वीच्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रत व रक्ताचे नाते सिद्ध करणारी कागदपत्रे यांच्या आधारे लागू नियमांनुसार जात वैधता देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
गावपातळीवरील कुणबी नोंदी नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात, जात प्रमाणपत्र व जात वैधतेसाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, तसेच प्रलंबित प्रकरणांसाठी स्वतंत्र कालबद्ध मोहीम राबवावी, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पात्रता प्रमाणपत्र काढण्यासाठी होणारा विलंब दूर करून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे लवकर उपलब्ध करून द्यावीत, तसेच ३१ डिसेंबर २०२५ पूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांना बँकेचे मंजुरी पत्र (Sanction Letter) ऑनलाइन अपलोड करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागण्या सह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नागरिकांच्या या प्रश्नांवर संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मराठा सेवक चंद्रकांत महाराज लबडे यांनी मराठा समाजाच्या वतीने केली.
यावेळी विखे साहेब बोलताना म्हणाले संबंधित अधिकाऱ्याला सांगून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकासाचे लाभार्थी ना लाभ मिळण्यास विलंब होणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी मराठा सेवक चंद्रकांत लबडे, धनंजय झिरपे, संदीप खरड,सुरेशराव नेमाने, नारायण लबडे, अशोक नलगे, दिपक शेंडे, संदिप मुंडे, किरण खापरे,हरी केसभट, अनिल सुपेकर, स्वप्निल काकडे, दादा रसाळ, रवींद्र गाडे, बंटी तानवडे यांच्यसह सकल मराठा समाज, शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील महामंडळाच्या लाभापासून वंचित असलेले बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
537
10




