महाराष्ट्र
37556
10
युवकांच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्वाचे योगदान- राहुल राजळे
By Admin
युवकांच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्वाचे योगदान- राहुल राजळे
पाथर्डी- प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन दादापाटील राजळे महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, शिक्षणमहर्षी स्व. दादापाटील राजळे, स्व.आमदार राजीव राजळे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. श्री. राहुलदादा राजळे, सचिव मा. श्री. नितीन शिंदे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.. मा. श्री. राहुलदादा राजळे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनाचा आढावा घेतला. सुसंस्कृत नागरीक व समाज घडविण्यात शिक्षकांची भुमिका महत्वाची असते असे त्यांनी सांगितले. तसेच महाविद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. नितीन शिंदे यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे जीवन यशस्वी करण्यात शिक्षकाचे महत्त्व त्यांनी सांगितले. प्रभारी प्राचार्य डॉ. एम एस. तांबोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आजच्या काळानुसार विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शिक्षण व्यवस्थेतील बदल स्विकारले पाहिजेत. तसेच त्यांनी अभिरूप शिक्षक म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी अभिरुप प्राचार्य म्हणून काम केलेल्या साक्षी बोरुडे व अभिरुप शिक्षक बनलेले कु. दिया पठाण, कु. प्रीती बर्डे, कु. ज्योती माळी, कु. पुजा ससे,अक्षय आव्हाड यांनी अध्यापन करताना आपल्याला आलेले अनुभव सांगितले. सदर दिवशी विद्यार्थ्यांनी अभिरुप शिक्षकाच्या भूमिकेतून शिकवण्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे आभार कु. गायत्री मरकड हिने मानले. तर सूत्रसंचालन कु. ज्ञानेश्वरी टेमकर हिने केले. या कार्यक्रम प्रसंगी, श्री. विक्रम राजळे, डॉ. जी. बी. लवांडे, डॉ. आर. टी. घोलप, प्रा. चंद्रकांत पनसरे व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. आसाराम देसाई, प्रा. दुर्गा भराट, प्रा. महेश गोरे, प्रा. योगिता इंगळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.आर. जे. टेमकर यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags :
37556
10




