महाराष्ट्र
14234
10
सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा पॉक्सो गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
By Admin
सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा पॉक्सो गुन्ह्यातील आरोपी अखेर जेरबंद, पाथर्डीतून ठोकल्या बेड्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डीत सापळा रचून आवळल्या मुसक्या बीड जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अंमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) कृष्णा चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकावर अहिल्यानगर जिल्ह्यातील फरार आरोपी शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे आरोपी अब्बास चव्हाण हा पाथर्डी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली आणि शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या.
कारवाई फत्ते करणारे पोलीस अधिकारी व पथक ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे आणि अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण, पोलीस हवालदार संदीप सांगळे, सतीश तरटे, श्याम खाडे आणि दीपक धोंडे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गेल्या सहा वर्षांपासून वास्तव्य बदलत पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करणाऱ्या एका सराईत आरोपीला अखेर कायद्याचा हिसका दाखवण्यात
बीड पोलिसांना मोठे यश आले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २०२० मधील पॉक्सो (POCSO) गुन्ह्यातील फरार आरोपी अब्बास चव्हाण याला अंमळनेर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर २०२६) सापळा रचून जेरबंद केले. या धडक कारवाईनंतर आरोपीला पुढील तपासासाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
२०२० पासून वास्तव्य बदलून देत होता गुंगारा मिळालेल्या माहितीनुसार, बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत २०२० मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली होती. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०६/२०२० अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३७६ व इतर कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (POCSO) कलम ३, ४ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी अब्बास चव्हाण (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) हा सातत्याने आपले ठिकाण व वास्तव्य बदलून पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता.
Tags :
14234
10




