महाराष्ट्र
1713
10
राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात साजरा
By Admin
राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात साजरा
पाथर्डी न्यूज नेटवर्क-
दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते आप्पासाहेब राजळे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य शांताराम खणगे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एस. तांबोळी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी डॉ. आसाराम देसाई यांनी भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाच्या निर्देशानुसार चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाबद्दल माहिती दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, राष्ट्रप्रेम आणि सेवाभाव रुजवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १९६९ मध्ये झाली. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच महाविद्यालयात एनएसएस युनिट कार्यरत असून सद्यस्थितीत दोनशे स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य शांताराम खणगे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य नॉट मी बट यु यात निस्वार्थ सेवाभाव आहे असे सांगितले. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची जाणीव निर्माण होते. समाजाप्रती असलेली जबाबदारी समजून घेऊन विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एस. तांबोळी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून येतो. एन एस एस स्वयंसेवक गरजू असलेल्या प्रत्येकाला त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी मदत मिळावी यासाठी काम करत असतो. यावेळी त्यांनी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा दुर्गा भराट यांनी केले. तर आभार प्रा. महेश गोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, कार्यालयीन अधीक्षक श्री. विक्रम राजळे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. योगिता इंगळे प्रा. चंद्रकांत पानसरे प्रा. तेजस्विनी राजळे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखाप्रमुख डॉ. जे. एन. नेहूल, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. आर. टी. घोलप, डॉ. जी. बी. लवांडे डॉ. के.जी. गायकवाड, डॉ. आर पी घुले, डॉ. साधना म्हस्के, डॉ. निर्मला काकडे, डॉ. रोहित आदलिंग, डॉ. अतुल चौरपगार, प्रा. देविदास खेडकर, प्रा. प्रदीप धनवडे महाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
1713
10




