महाराष्ट्र
13884
10
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत POCSO
By Admin
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत POCSO कायद्याबाबत भव्य जनजागृती कार्यक्रम संपन्न
नेवासा तालुका प्रतिनिधी
नेवासा : दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी पंचायत समिती नेवासा व तालुका विधी सेवा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत POCSO कायद्याबाबत भव्य जनजागृती कार्यक्रम श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकजी तुवर सर यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “मुले ही देशाची खरी संपत्ती आहे. त्यांचे संरक्षण करणे ही केवळ कायद्याची नाही, तर आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. महाविद्यालयाने अशा सामाजिक विषयांवर नेहमी पुढाकार घ्यावा.”
यानंतर गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री. शिवाजीराव कराड साहेब यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “शिक्षक हा विद्यार्थ्यांचा दुसरा पालक असतो. मुलांच्या वर्तनात होणारा बदल शिक्षकांनी ओळखला पाहिजे. मुलांनी सांगितलेली गोष्ट गांभीर्याने ऐका. सुरक्षित बालपण हेच समृद्ध भारताचे भविष्य आहे.”
त्यानंतर विस्तार अधिकारी, पंचायत समिती नेवासा, श्री. योगेश राणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना ‘सुरक्षित बचपन अभियान’ या उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “सुरक्षित बचपन अभियानाचा उद्देश केवळ कायदा सांगणे नाही, तर मुलांशी विश्वासाचे नाते जोडणे, सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि जागरूक समाज घडवणे हा आहे. प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावात ही जनजागृती पोहोचली पाहिजे.”
यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अॅड. जे. एन. शेख साहेब यांनी POCSO कायदा 2012 ची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “18 वर्षांखालील मुलांवरील कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला या कायद्याने गंभीर गुन्हा मानले आहे. मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही समान संरक्षण आहे. घाबरू नका, लपवू नका, वेळीच सांगा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते.” त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याच्या विविध तरतुदींची माहिती देऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अॅड. बामकर साहेब व केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद साहेब उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना कायद्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य श्री. हरिश्चंद्र माने सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन, पाहुण्यांचे स्वागत व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केले.
यावेळी प्रा. विरकर, प्रा. काळे सर, प्रा. बर्डे सर, प्रा. सोनवणे सर, प्रा. जामदार सर, प्रा. कविता जाधव मॅडम, प्रा. खर्डे सर, प्रा. पवार सर, भागवत सर यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खरात सर यांनी केले. त्यांनी POCSO कायदा, अभियानाची पार्श्वभूमी आणि कार्यक्रमाचा उद्देश सविस्तरपणे स्पष्ट केला.
कार्यक्रमाच्या शेवटी पर्यवेक्षक प्रा. गोवर्धन रोडे सर यांनी सर्व मान्यवर, पाहुणे, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. “बालकांचे संरक्षण हीच आपली जबाबदारी” हा महत्त्वपूर्ण संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags :
13884
10




