महाराष्ट्र
29381
10
मुळाचे पाणी पेटले; शेतकऱ्यांसह महिला रस्त्यावर
By Admin
मुळाचे पाणी पेटले; शेतकऱ्यांसह महिला रस्त्यावर
मळेगाव येथे शेतकऱ्यांचे तीन तास रास्ता रोको आंदोलन
शेवगाव तालुका- यावर्षी पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मळेगाव व परिसरातील शेतकरी व महिला भगिनींनी पाट पाण्यासाठी रस्त्यावर उतरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
मुळा पाटबंधारे विभागांतर्गत उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू होऊन दीड महिना उलटला तरी टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पाटपाण्याचा थेंबही न मिळाल्याने संतप्त झालेल्या दहा गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात मळेगाव, ता. शेवगाव येथे शेवगाव-नगर रस्त्यावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
मुळा पाटबंधारे विभागांतर्गत मुळा उजव्या कालव्याला शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडले. मात्र, पाणी सुटून जवळपास एक्कावन दिवस झाले तरी मुळा पाटबंधारे विभागाच्या वितरिका क्रमांक २ ला थेंबही न आल्याने या अंतर्गत येणाऱ्या वडुले, वाघोली,
आव्हाणे, दिंडेवाडी, चव्हाणवाडी, गरडवाडी, ढोरजळगाव, बऱ्हाणपूर, मळेगाव, सामनगाव, या गावांतील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात एकत्र येत सोमवारी मळेगाव येथे सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी बोलताना संजय कोळगे म्हणाले की, शेजारील तालुक्यातील कासार पिंपळगावसह अनेक गावांमध्ये कॅनॉलचे दोन ते तीन वेळा पाणी सुटले असून,
साहेब, मुळाच्या कालव्याला पाणी सुटून दीड महिना झाला तरी आम्हाला अजूनही हक्काचे पाणी मिळाले नाही. आमची पिके पाण्याअभावी जळून गेली असीन, आता पिण्यासाठी पाणी तरी सोडा, पिकांचा तर पूर्णपुणे धुराडा झाला आहे.- व्दारका बडे (मळेगाव).
पाटबंधारे विभागाच्या विरोधात शेतकरी आक्रमक
या वेळी रखरखत्या
उन्हामध्ये आंदोलनकर्त्या महिलांची संख्या लक्षणीय होती. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता स्वप्निल देशमुख यांनी दूरध्वनीवरून सायली पाटील यांच्याशी संवाद साधला असताना संतप्त झालेल्या महिला आंदोलक द्वारका बडे, दिपाली गायकवाड, सुदामती फुंदे यांनी मुख्या अभियंता पाटील यांना चांगलेच फैलावर घेतले. पाटील यांनी उद्याच या वितरिकेला पूर्णदाबाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.
तेथे सर्वत्र पाणीच पाणी झाले असताना शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. आमचा पाण्यावर हक्क नाही का? आमच्यावर लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक दुजाभाव केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असताना शेवगाव तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांबरोबर पाणी वाटपात दुजा भाव कशासाठी?
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक पाटपाणी वाटपात अन्याय करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता सायली पाटील आणि अमरापूर उपविभागाचे उपअभियंता संदीप शेळके यांचे निलंबन करून कारवाई करण्याची मागणी संजय कोळगे बोलताना केली.
अण्णासाहेब ढोके यांनी दहा
गावांतील शेकडो एकर उभी पिके वाळून चालली असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली.
या वेळी बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, सुभाष वाणी, अनिल खैरे, चंद्रकांत निकम, राजेंद्र देशमुख, सुधाकर लांडे, दादासाहेब दिवटे, सुरज घोरपडे, यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लक्ष्मण नांगरे, कमलाकर गरड, प्रवीण मुटकुळे, दीपक चोथे, कैलास मुटकुळे, आदिनाथ कापरे, रघुनाथ सातपुते, शहाजी कमानदार, लक्ष्मण दिंडे, संतोष थोरात, विष्णुपंत गरड, संभाजी दिवटे, यांच्यासह दहा गावांतील शेकडो शेतकरी, महिला उपस्थित होत्या. आंदोलनासाठी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामहरी खेडकर, आनंद घनवट, नितीन भताने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
Tags :
29381
10




