वृध्देश्वर' च्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ
By Admin
वृध्देश्वर' च्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ,साडेपाच लाख मेट्रीक टन ऊस गाळप उद्दिष्ट - आ.राजळे
पाथर्डी : अंतर्गत मशिनरी बदल करीत स्वयंचलित यंत्रणा बसविल्याने गाळप वेग वाढला आहे. प्रतीदिन किमान तीन हजार मेट्रीक टन ऊस गाळप होऊ शकेल. कार्यक्षेत्रात साडेतीन लाख तर बाहेरून दीड लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध होईल. यावर्षी साडेपाच लाख मेट्रीक टन ऊस गाळप उद्दिस्ट संचालक
मंडळाने ठेवले आहे. मागील वर्षी एफआरपी पेक्षा १९३ रुपये जास्तीचा दर वृध्देश्वरने दिलाय. या हंगामातही इतरांच्या बरोबरीने ऊसदर देऊ, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
सोमवारी सकाळी कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन लताबाई व बापूसाहेब पाटेकर आणि शिवकन्या
व संदीप लोखंडे यांच्या हस्ते विधीवत झाले. या वेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरु, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, आकाश दहाडदे यांच्या हस्ते गव्हाणपूजा करून उसाची पहिली मोळी टाकण्यात आली. त्यानंतर ऊसउत्पादक शेतकरी सभासदांशी संवाद करताना त्या बोलत होत्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
करून जास्तीचे ऊस उत्पादन घेत ऊस पुरवठा केल्याबद्दल अनंत वाघ, संतोष गर्जे, पांडुरंग गवळी, रतन एकशिंगे, शशिकांत मचे, भिवसेन खेडकर, उद्धव ताठे, दत्तात्रय भगत, राहुल मचे, मधुकर वारे, कारभारी कदम, साहेबराव पवार यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी उद्धवराव वाघ यांचे भाषण झाले. सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामीण भागाला खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य दिले असल्याचे प्रांताधिकारी प्रसाद मते म्हणाले. राहुल राजळे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब गोल्हार यांनी आभार मानले. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अभय आव्हाड, मंगला कोकाटे, सुभाष बर्डे, पुरुषोत्तम आठरे, काकासाहेब शिंदे, धनंजय बडे, संतोष शिंदे, कार्यकारी संचालक नितीन शिंदे, बाबासाहेब चितळे, सचिन नेहूल, नारायण धस कामगार, ऊस उत्पादक व सभासद उपस्थित होते.
23979
10




