महाराष्ट्र
13695
10
शहीद हिल २६-११ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न,
By Admin
शहीद हिल २६-११ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न,
साडेपाचशे विद्यार्थी खेळाडु सहभागी
नाशिक न्यूज नेटवर्क-
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यु इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात संत गाडगे महाराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित एस जी एम स्पोर्ट्स मॅरेथॉन नुकतीच संपन्न झाली १६व्या २६-११ शहीद हिल मॅरेथॉन स्पर्धा विजेतेपद सोमनाथ शिंदे यांना यांनी पटकावलं आहे.कवडदरा येथे १६वी शहीद हिल मॅरेथॉन (दि.२२) सकाळी सात वाजता मॅरेथॉनला सुरुवात झाली मॅरेथॉनच्या उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब बोराडे माजी सैनिक अशोक सर पंकज सर बोराडे सर शांताराम सगर अंबादास निकम,मुख्याध्यापक बी.एस.पवार,पोलिस पाटील प्रकाश रोंगटे,संपत रोंगटे,अमोलराजे म्हस्के,भाऊराव रोंगटे,पोलिस कर्मचारी बाळकृष्ण लहामटे,गणेश रोंगटे,अनिल निसरड तसेच उपस्थित इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मॅरेथॉनमध्ये खेळाडू सहभागी झाले. साडेपाचशे विद्यार्थी खेळाडु सहभागी झाले होते.या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- मोठा गट मुले- प्रथम क्रमांक राजेंद्र रामदास शिंदे,व्दितीय क्रमांक-गोकुळ तानाजी बर्डै,तृतीय क्रमांक-अभिषेक दौंडे,लहान गट- प्रथम क्रमांक-अजिंक्य लहु गागरे,व्दितीय क्रमांक-गणेश शंकर जाधव,तृतीय क्रमांक-राहुल सुदाम रोंगटे,मुली (लहान गट) प्रथम क्रमांक-अदिती गोरख गोंदके,व्दितीय क्रमांक-मयुरी मनोहर गोडे,तृतीय क्रमांक-विद्या भोरु रोंगटे,(मुली-मोठा गट) पायल तुकाराम खाडे,रिध्दी प्रविण बो-हाडे,ऋतुजा सोमनाथ फोकणे या विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत यश मिळवले आहे.
बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले आहे. बक्षीस वितरणाचे प्रमुख अतिथी विरेंद्र पांडुरंग पवार जनरल मॅनेजर फ्रूट इन्स लिमिटेड,सोनवणे सर,इथापे सर मुख्याध्यापक भगवान पवार, रणजीत सोनवणे एमआयडीसी माळेगाव आधार संस्थेचे प्राध्यापक संदेश सावंत यावेळी उपस्थित होते कैलास साहेब प्रदीप चौधरी साहेब सोनवणे मॅडम राणी बोराडे मॅडम यावेळी उपस्थित होते.संत गाडगे महाराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचालित एस जी एम स्पोर्ट्स आयोजित मॅरेथॉन १६व्या २६/११ शहीद हिल मॅरेथॉन पुरस्कारांचे वितरण फुड इज इन्स लिमिटेड कंपनीचे चेअरमन विरेंद्र पांडुरंग पवार यांच्या हस्ते या वर्षाचा क्रिडा प्रोत्साहन पुरस्कार
आदर्श खेळाडू पुरस्कार देण्यात आला.यावेळी संभाजी मधुकर बडगुजर
सहाय्यक अभियंता, नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे,संदीप सरोदे सर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ,डाॕ. रमेश सातपुते संजीवनी घोटी हॉस्पिटल वैद्यकीय सेवा पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर स्पर्धा पूर्ण झाल्यावर खेळाडूंना स्वादिष्ट अल्पोहर देण्यात आला सर्वांनी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला
Tags :
13695
10




