महाराष्ट्र
17610
10
जिल्हा बॕक- ८ जागेवर संचालक बिनविरोध, १३ जागावर निवडणूक
By Admin
जिल्हा बॕक- ८ जागेवर संचालक बिनविरोध, १३ जागावर निवडणूक
अहिल्यानगर - बहुचर्चित अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर फोल ठरले आहेत. पारनेरसह अकोले, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर, राहुरी या सात सेवा सोसायटी मतदारसंघासोबतच इतर ६ जागावर एकमत झाले नाही. त्यामुळे २१ पैकी १३ जागांवर निवडणूक लढली जाणार आहे.
तर, सेवा सोसायटी मतदारसंघातील सात जागांसह बिगर शेती मतदारसंघातील एक अशा एकूण आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात संगमनेरम धून रणजीत देशमुख, नेवासेमधून शंकरराव गडाख, कोपरगावमधून आ. विवेक कोल्हे, शेवगावमधून राजश्री घुले, श्रीरामपूरमधून करण ससाणे, राहातामधून डॉ. सुजय विखे व पाथर्डीमधून आ. मोनिका राजळे हे सेवा सोसायटी मतदारसंघातील सात, व बिगर शेती मतदारसंघातून आ. संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप असे आठ जण बिनविरोध निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी निम्म्यापेक्षाही कमी जागा बिनविरोध झाल्या आहेत.
खासदार नीलेश लंके पारनेर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून माघार न घेण्याच्या मुद्यावर ठाम राहिल्याने निवडणूक अटळ ठरली. याठिकाणी विखे गटाकडून त्यांचे समर्थक व भाजपाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली असून लंके-शिंदे ही लढत पुन्हा एकदा रंगणार आहे. तर नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून आ. अक्षय कर्डिले यांच्याविरोधात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके हे रिंगणात उतरले आहेत.
राहुरीमधुन आ. प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दंड थोपटले आहेत. अकोलेमधून आ. किरण लहामटे यांच्या विरोधात बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर यांची कन्या संजीवनी शिंदे रिंगणात आहेत. तर अनुसुचित जमाती मतदार संघातून माजी आ. वैभव पिचड व माजी खा. सदाशिव लोखंडे यांचे सुपुत्र लोखंडे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह वाटप २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
जिल्हा बँकेच्या १४ सोसायटी मतदारसंघासह ७ सर्वसाधारण मतदारसंघातील जागांसाठी निवडणूक बिनविरोध ची प्रक्रिया सुरू असताना पारनेरसह अकोले, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर, राहुरी या सात ठिकाणी ठोस निर्णय झाला नाही. यासह इतर सहा जागांवर रस्सीखेच सुरू राहिल्याने जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तब्बल २४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात नेवासा व संगमनेर अर्ज छाननीत बिनविरोध झाले होते. उर्वरित १९ जागांसाठी २३९ उमेदवार राहिले होते. त्यातही सोमवारपर्यंत अवघ्या २२ जणांनी माघार घेतल्याने २१७ उमेदवार रिंगणात होते. आज अर्ज घेण्याच्या
माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतली. शहर शोधा
दरम्यान, ज्या काही जागांबाबत तिढा आहे. त्यावर चर्चा करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आज दुपारी १२ वाजता बँकेच्या नवनिर्वाचित २१ संचालकांची नावे जाहीर करतील, त्यानंतर ज्यांची नावे या यादीत नाही त्यांनी तातडीने आपली उमेदवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत केले होते. परंतु पारनेरसह काही जागांवर तोडगा न झाल्याने अखेर निवडणूक निश्चित झाली. शिंदे यांनीच आज दुपारी त्यांच्या चार जागा जाहीर केल्या. यात कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघातून ज्योती प्रकाश शिंदे, जामखेड सेवा सोसायटी मतदारसंघातून सचिन नवनाथ घुमरे, महिला राखीव मतदारसंघातून मंजुषा राजेंद्र गुंड व इतर मागासप्रवर्गातून अजीनाथ रामभाऊ हजारे या चौघांची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. शिंदे विखे-थोरात सहमती एक्सप्रेससोबत राहणार, खा. लंकेंसोबत जाणार की सवतासुभा उभारणार याबाबत उत्सुकता आहे.
२१ जागांपैकी बिनविरोध झालेल्या ८ जागा
१
) रणजीत देशमुख - संगमनेर सेवा सोसायटी मतदार संघ
२) शंकरराव गडाख नेवासा सेवा सोसायटी मतदार संघ
३) विवेक कोल्हे - कोपरगाव सेवा सोसायटी मतदार संघ
४) राजश्री घुले - शेवगाव सेवा सोसायटी मतदार संघ
५) करण ससाणे - श्रीरामपूर सेवा सोसायटी मतदार संघ
६) मोनिका राजळे पाथर्डी सेवा सोसायटी मतदार संघ
७) सुजय विखे - राहाता सेवा सोसायटी मतदार संघ
८) सचिन जगताप बिगर शेती मतदार संघ
Tags :
17610
10




