महाराष्ट्र
22855
10
पाथर्डी-तारकेश्वर गड रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने
By Admin
पाथर्डी-तारकेश्वर गड रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत दुपदरी व्हावे.-बाळासाहेब ढाकणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पत्राद्वारे ढाकणे यांनी केली मागणी
पाथर्डी तालुका प्रतिनिधी
पाथर्डी तारकेश्वरगड हा रस्ता अत्यंत खराब झाला आसून रस्त्यामध्ये मोठमोठाले खड़े पडले आसून वैराग्यमुर्ती , वाचास्पती थोर साधू वामनभाऊ , ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्यानंतर वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेथीत केले असे महान संत वेदांतचार्य वैकुंठवाशी नारायणमहाराज यांची समाधी तारकेश्वरगड येथे आहे त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातुन तारकेश्वरगड येथे सद्गुरूनारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण येत आसतात . पाथर्डी ते तारकेश्वरगड हा रस्ता अत्यंत खराब आसून एकपदरी आसल्या मळे वाहनांची खुपच कोंडी होते रस्त्यामध्ये खुपच मोठमोठे खड़े पडलेले आसल्यामुळे वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते तसेच सदरच्या रस्त्यावर धोकादायक वळणे आसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वाटते .
गहीनीनाथगड , भगवानगड या नंतर तारकेश्वरगड हे वारकरी संप्रदायाचे अध्यात्मीक केंद्र आहे . तारकेश्वरगडाचे मठाधीपती आजीनाथ महाराजशास्त्री तारकेश्वर गडावर गोशाळा चालवतात तसेच वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक ज्ञान प्रसारणाचे मोठे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे .
मा . मुख्यमंत्रीसाहेब आपण गहीनीनाथगड , भगवानगड या भक्तांच्या श्रद्धास्थान आसणाऱ्या गडाकडे ज्याप्रमाणे व्यक्तीगत लक्ष घालुन विकासकामे करत आहात त्याचप्रमाणे गहीनीनाथगड ,भगवानगड या नंतर वारकरी संप्रदायाचे कार्य चालु आसणाऱ्या तारकेश्वर गडाच्या विकासकामासाठी वयक्तीक लक्ष घालून पाथर्डी ते तारकेश्वरगड या रस्त्याचे रुंदीकरण करून सदरचा रस्ता दुपदरी व्हावा व सदरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजूर करून तारकेश्वर गडाच्या विकास कामात मुख्यमंत्री साहेबांनी हातभार लावावा अशी माघणी पाथर्डी भाजपाचे जेष्ठ नेते व तारकेश्वरगडाचे संस्थापक वैकुंठवाशी वेदांतचार्य नारायण महाराज यांच्या भक्तमंडळीच्या वतीने व सद्गुरू नारायण महाराज यांचे भक्त शेतकरीनेते बाळासाहेब ढाकणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .
Tags :
22855
10




