महाराष्ट्र
12821
10
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सभासद वार्षिक सर्वसाधारण सभा
By Admin
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सभासद वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पाथर्डी न्यूज नेटवर्क-आदिनाथनगर
कारखाना कार्यक्षेञातील ऊस बाहेर जातो.यामागील कारणे शोधणे आवश्यक आहे.ब-याच कारखाना क्षेत्रातील ऊस पळवापळव होते.राज्य शासनाच्या धोरणानुसार
आपल्या आजुबाजुच्या आपल्या जिल्ह्याबाहेरच्या कारखान्याची क्षमता वाढलेली आहे.दुसऱ्या कारखान्याची स्पर्धा करायची असून आपल्या समोर प्रचंड आव्हान आहे.सहकारातील कारखाना असून सहकार टिकला पाहीजे.कारखान्यावर कुठल्या प्रकारचे थकीत कर्ज नाही.शेजारच्या कारखान्याची इथेनाॕल क्षमता वाढ झाली.ऊस शेतकी संदर्भात काही चुका होतात.ऊसतोडणी मुकादम कडुन कधी अडचणी येतात.परंतु यामध्ये संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने काम करत आहे.स्व.सहकार महर्षी दादापाटील राजळे यांनी चौथी शिकलेले असतानाही या भागात साखर कारखाना सुरू केला.कारखान्याचा तोटा होवू नये अशी आपली सर्वाची इच्छा आहे.आणखी भविष्यात कारखाना संदर्भात काही प्रगती करता येईल यांच्यावर निर्णय घेत संचालक मंडळ आहेत.सभासदाची ठेव नऊ कोटी शेअर्स जमा आहे.काही सभासदाचे शेअर्स अपुरे असुन ते सभासदानी पुर्ण करावे.
सभासदानी कारखान्याला घातलेल्या ऊसाचे पुर्ण पेमेंट केलेले आहे.आपल्या कार्यक्षेञातील ऊस बाहेर जातो हे चुकीचे होत आहे.कारखाना टिकला पाहीजे.ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.केंद्र व राज्य सरकारचे साखर कारखान्या संदर्भात धोरणे येतात त्याच्या आपल्याला स्विकार करणे आवश्यक आहे.आर्थिक चक्र सांभाळून आपल्याला ऊसाला योग्य भाव द्यायचा आहे.सभासदांना देण्यात येणाऱ्या साखरेच्या भावात योग्य तो निर्णय घेऊ असे आ.मोनिका राजळे यांनी सांगितले.शेतकरी,ऊस उत्पादकाचा नुकसान होणार नाही.त्यांच्या विचार करुन एफआपी प्रमाणे संचालक मंडळ विचार करुन ऊसाला भाव देण्यात येईल.शेतकऱ्यांचा वेळेवर ऊसतोड कशी होईल या संबंधी योग्य नियोजन केले जाईल.कारखान्याच्या संचालक मंडळाला कर्मचारी व ऊस तोडणी कामगारांना सहकार्य करावे.बाहेरच्या कारखान्याला ऊस देऊ नका.
बाहेरचे कारखाने आमिष दाखवत असतील.परंतु हा कारखाना आपल्या सर्वाच्या परीवाराचा आहे.असे आमदार मोनिकाताई राजळे यांनी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सभासद वार्षिक सर्वसाधारण सभा प्रसंगी मत व्यक्त केले.
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सभासद सभा (दि.२८)रोजी कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली.यावेळी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आप्पासाहेब दादाबा राजळे,व्हा.चेअरमन बा.र.किलबिले,संचालिका व शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे तसेच संचालक मंडळ रा.आ.काकडे,सु.बा.ताठे,रा.आ.राजळे,उ.र.वाघ,अ.शि.फलके,दि.सु.अंदुरे,य.नि.गवळी,सं.बा.लोखंडे तसेच सर्व सभासद तसेच कारखान्यातील कामगार वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच यावेळी माजी जि.प.सदस्य व सभासद शिवशंकर राजळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, साखर कारखान्याच्या ६० कोटी तोटा आहे.साडे तीनशे कोटी रुपये कारखान्यावर एनसीडीसी,एडीसीसी बॕकेचे कर्ज आहे.काही सभासदांनी कारखान्याच्या निवडणूकीच्या वेळेस सांगितले की,आम्ही सगळे कागदपत्रे दिली परंतु आमच्या वारसाची नोंदी घेतल्या नाहीत.निवडनुकीच्या वेळेस निवडणुकीच्या मतदार संख्या साडे आठ हजाराची नोंद आहे.सगळ्यांना निवडणूकाच्या वेळेस मतदान करता आले नाही.
प्रशासनाने वारस नोंदी करुन घ्यावी.तसेच त्यांना पोहच पावती द्यावी.तसेच त्यांना सभासद करुन घ्यावे.सभासदांना जुन्या दरा प्रमाणे ३१ रुपये किलोनी साखर द्यावी.
सभासदांना साखर पुर्वीच्या ३१ रुपये प्रमाणे द्यावी.कारखान्याने सभासदाच्या बाजुने रहावे.सभासद बाहेर ऊस देतात यांचे आत्म परीक्षण करावे.ऊस तोड वेळेवर होत नाही.कारखान्याच्या ऊस काट्यावर शेतकऱ्यांचा विश्वास नाही.शेतकऱ्यांना परवानगी द्यावी बाहेरील काट्यावर ऊसाचे वजन करुन परत पुन्हा कारखान्याच्या काट्यावर वजन करा.फरक झाला तर तुम्ही जो दंड कराल तो आम्ही देऊ.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब गर्जै यांनी सांगितले की,आपण इथेनाॕल करायला आपण सर्व सभासदांनी पांठीबा दिला.ही आपली चुक झाली.यावर्षी जर ऊस बाहेर जायचा नसेल तर योग्य प्रशासकीय नियोजन चांगले करा.ऊस वृद्धेश्वर कारखान्याला घाला.असे आवाहनही बाळासाहेब गर्जै यांनी यावेळी केले.तसेच कारखान्यावरील कर्जाचे योग्य नियोजन आराखडा तयार करा.ऊसाला पाच हजार रुपये भाव द्यावा अशी मागणीही बाळासाहेब गर्जै यांनी केली.
Tags :
12821
10




