खत अनुदानासाठी ६२,३७० कोटींची तरतूद;फॉस्फेटिक आणि पोटॅशिक NBS दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली
मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय
नवी दिल्ली नगर सिटीझन टिम नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 77 हजार कोटी रुपयांच्या पाच महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय खत अनुदानासंदर्भात घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांपासून ते छोट्या व्यावसायिकांपर्यंत आणि मेट्रो प्रवाशांपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
रब्बी हंगामासाठी केंद्राचा मोठा निर्णय
खत अनुदानासाठी ६२,३७० कोटींची तरतूद
फॉस्फेटिक आणि पोटॅशिक NBS दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मागील रब्बी हंगामाच्या तुलनेत अनुदानाच्या अर्थसंकल्पीय गरजेत २४,४१७.७३ कोटी रुपयांची वाढ
DAP आणि NPKS यांसह फॉस्फेटिक व पोटॅशिक खतांवर अनुदान मिळणार
१ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी मंजूर दर लागू
शेतकऱ्यांना खते अनुदानित आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा उद्देश