महाराष्ट्र
21095
10
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथे वाचन प्रेरणा दिन
By Admin
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथे वाचन प्रेरणा दिन व भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
नेवासा तालुका न्यूज नेटवर्क-
मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई संचलित श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथे गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन व भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तुवर हे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. हरिचंद्र माने, पर्यवेक्षक प्रा. गोवर्धन रोडे, विज्ञान प्रदर्शन समन्वयक प्रा. रामराव काळे, अकॅडमिक चेअरमन प्रा. सुभाष सोनवणे तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कवडदरा, ता. इगतपुरी येथील प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्राचार्य पवार भगवान, लोहार श्रीराम, परदेशी प्रमोद, भालेराव अमोल, गायकवाड राजेंद्र हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी ग्रंथालय विभागामार्फत डॉ. कलाम यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक तुवर म्हणाले, "ज्ञानेश्वर महाराजांनी या नेवासा भूमीत ज्ञानेश्वरीतून ज्ञान दिले, तर डॉ. कलामांनी विज्ञान दिले. 'वाचाल तर वाचाल' हा संदेश विद्यार्थ्यांनी अंगीकारावा. वाचनाने माणूस समृद्ध होतो."_
यावेळी सर्व मान्यवरांनी विज्ञानाच्या छोट्या-छोट्या प्रयोगातून विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक करून दाखवले, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल अधिक कुतूहल निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रामराव काळे यांनी केले. त्यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश आणि प्रा. हरिश्चंद्र माने सर यांनी वाचन प्रेरणा दिन व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे महत्त्व विशद केले. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर मनोगत झाले. यावेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी नवसंशोधन, नाविन्यता आणि विज्ञानाची कास धरावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. देविदास साळुंके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कविता जाधव यांनी मानले.
या प्रदर्शनासाठी प्रा. मयूर जामदार, प्रा. कदम किरण, प्रा. नवले सुजय, प्रा. सुकन्या फाटके, प्रा. निलेश कदम, प्रा. अमर भनगे, प्रा. श्रद्धा जायगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी प्रा. भगवंत विरकर, प्रा. घावटे संजय, प्रा. भागवत उमेश, प्रा. खरात नितीन, प्रा. पंडित हरिश्चंद्र, प्रा. सूर्यकांत बर्डे, प्रा. पवार रामभाऊ, प्रा. घोलप रवींद्र हे शिक्षक वृंद उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती व प्रोजेक्ट सादर केले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व शिक्षक स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags :
21095
10




