एक क्षण एक जीव…’ पथनाट्यातून हृदयविकाराच्या आपत्कालीन प्रसंगी
By Admin
एक क्षण एक जीव…’ पथनाट्यातून हृदयविकाराच्या आपत्कालीन प्रसंगी जनजागृती
सिन्नर तालुका न्यूज नेटवर्क-
नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या D. P. Kharde Navjeevan College of Pharmacy, Nandur Shingote यांच्या वतीने NAVJEEVAN SWASTHA SETU 2026 या आरोग्य जनजागृती अभियानांतर्गत आज, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी, विद्यार्थी विकास मंडळाच्या पुढाकाराने ‘एक क्षण… एक जीव…’ या विशेष पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.
रेणुका माता मंदिर, नांदूर शिंगोटे येथे सकाळी ९.०० वाजता झालेल्या या पथनाट्यात Cardiac Arrest ओळखणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य कृती करणे, तातडीने मदत मागविणे तसेच CPR चे महत्त्व याबाबत प्रभावी पद्धतीने जनजागृती करण्यात आली.
आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी केलेली योग्य कृती एखाद्याचा जीव वाचवू शकते, हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविला. ‘प्रथमोपचार शिका, जीवन वाचा’ आणि ‘जागरूक नागरिक, सुरक्षित समाज’ या संदेशातून नागरिकांनी आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाला स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रेणुका माता मंदिर समितीच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून आरोग्यविषयक ज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमास सरपंच मा. दीपक बारडे, स्थानिक समिती सदस्य श्री. राजूशेठ खर्डे, माजी सरपंच श्री. गोपाळ शेळके, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुदाम आव्हाड व श्री. सुरेश कुचेकर, ज्येष्ठ नागरिक श्री. भाऊपाटील शेळके व श्री. शेळके सर, तसेच सेवानिवृत्त डीआयएसपी श्री. सानप यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी Navjeevan Education Society’s चे अध्यक्ष Hon. Smt. Vijaya Deshmukh, Managing Trustee Hon. Shri Shubhash Deshmukh, Secretary Shri Vijay B. Kale, Executive Director Ms. Shirin Deshmukh तसेच Hon. Shri Pralhad Deshmukh यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य Dr. Hiteshkumar Agrawal यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
‘एक क्षण… एक जीव…’ या पथनाट्याच्या माध्यमातून जागरूकता प्रथमोपचार जीवनरक्षण हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. NAVJEEVAN SWASTHA SETU 2026 अंतर्गत महाविद्यालयाकडून आरोग्य, औषधोपचार व सामाजिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
176
10




